बघसि न का मज पापि म्हणुनिया? तार अशा अधमाला।


(चाल: तुमबिन मोरी कौन खबर ले..)
बघसि न का मज पापि म्हणुनिया? तार अशा अधमाला।
कोण जाणि मम प्रेम तुझ्याविण ?सांगू तरी कवणाला ?।।धृ ० ।।
जीव बावरा तळमळतो हा, झोप न ये नयनाला।
कधि पाहिन,कधि पाहिन वाटे, क्षण क्षण हा जड झाला ।।१ ।।