ये करुणानिधि, हृदयपावना! भेट सख्या, प्रभुराया!।
भजन ७७
(चाल: तुमबिन मोरी कोन..)
ये करुणानिधि, हृदयपावना! भेट सख्या, प्रभुराया!।
तळमळतो हा जीव दर्शना, येइ जिवा सुखवाया।।धृ०।।
भवसागर हा कठिण गमे मज, जातो वाटे वाया।
सुबुध्दि दे, मन शांत करी हे, आवरुनी ही माया ।॥।१ ॥।
तुजविण कोण पुरवि ही आशा, दीनाची यदशथा?
धाव, धाव बा, रुक्मिणिरमणा! ब्रीद न सोडी वाया ।।२॥।
नेत्र तुझ्याविण त्रस्त सदा हे,कधि निवविशि हृदया या?
तुकड्यादास उदास जगी या, दे निर्भय जिवना या।।1३॥।