प्रीय बासरी वाजवि सगुणा धावत ये गिरिधारी! |
भजन ७९
(चाल: तुमबिन मोरी कोन..)
प्रीय बासरी वाजवि सगुणा धावत ये गिरिधारी! |
वाट पाहती गोपि-गोप तव, लावुनि नेत्र बिचारी ।। धृ०।।
शिवती न रानी गायि तृणाला, कर्ण उंच टवकारी;
बघति तुला रे वनवन सगुणा! भेटसि का न मुरारी! |।१ ।|
श्रृति-गोपी किति सचिंत बसल्या, कुंजवनी निर्धारी।
मनमोहन कधि पाहू म्हणती, द्रोपदिचा केवारी |।२ ।।
बहत लोटले दिवस अता हे, तळमळतो जिव भारी।
असुर मातले भारतभूवरि, संकट कोण निवारी? ||३ ।।
चक्र सुदर्शन प्रगट करी ते, फुंकुनिया रणभेरी।
धर्मप्हास हा का बघवे तुज? दीन जनांना तारी|।४॥।।
विसरुनि गेला वाक्य तुझे ते प्रभु धर्माला तारी ।
पाप असे बघवे न अम्हाला, परवश जनता सारी|।५ ।।
तुकड्यादास म्हणे किति सांगू? काय कळे न मुरारी! ।
पाहू नको रे अंत आमुचा, लगबग गरुड सवारी।।६।।