बघता शोध मिळेना, भिन्न मते त्यांची ।


बघता शोध मिळेना, भिन्न मते त्यांची ।
देव भजू की गुरु भजावा? मनि शंका जाची 1१

काय करावे कर्म तरी, हे सांगेना कोणी ।
अपुले अपुले सर्वच वदती, गुंग होत वाणी ।1२॥।
सत्‌ संगतिचा लाभ घ्यावया, भटके जिव माझा |

आड येति षडरिपू, मिरविती विषयाचा वाजा 11३ 1।
हृदय बावरे चंचल झाले, स्थीर जरा नाही ।
उपाय सद्गुरुवाचुनि आता न पडे मज ठाई ।।1४॥|
सर्व-साक्षि सद्गुरु! तुम्हा का लागे सांगावे ?
तुकड्यादासा भाव जाणुनी उचित प्रेम द्यावे ५ ॥।