क्षणीक हे श्रीमंती-वैभव, त्यागा गुरुपायी ।
(चाल: पतीतपावन नाम...)
क्षणीक हे श्रीमंती-वैभव, त्यागा गुरुपायी ।
कोणि आजवर शिरी धनाचा, गड नेला नाही।।धृ०।।
करिता धडपड पेशासाठी, वय सारे गेले।
आजे-पणजे कष्ट भोगता, जगी व्यर्थ मेले ।।१॥।
सगे-सोयरे, चालतिचे हे, पाहूनिया पळती ।
कोणि पुसेना आपत्काली, जरा न हळहळती ।।२॥।
कसा साधशिल मोक्षसुखाला, संसारामाजी ?
धरी गड्या! गुरु-पाय, ऐक रे ! दीनाची अर्जी ।।३॥।
तुकड्यादास म्हणे-जा आधी, गुरुज्ञाना शोधी ।
त्याविण कोणी साथ करीना, का फसला बंदी? ।।४॥।