नसे ज्ञान, सत्कर्म, आत्मसुख, त्याग जयापाशी ।

(चाल: पतीतपावन नाम..)
नसे ज्ञान, सत्कर्म, आत्मसुख, त्याग जयापाशी ।
ऐशा गुरुला शरण जाउनी काय गड्या! घेशी? ।|धृ० ||
दगडाची करुनिया नाव जरि बसलो होसेने ।
क्षणीच गेली बुडूनि, झाले तसेचि या गुरुने ।।१॥।
शिष्य करोनी इहपर ज्याने, साधवले नाही।
धिक्क असे तो गुरु, कशाला जाता त्या-पायी? ।।२॥|
ज्या संगाने बोध होइना, मानुष -कृत्याचा ।
झाला जरि तो साधू, त्यागा संग अशा गुरुचा ।।३॥।
कनक-कामिनी मोहविती ज्या, मरती कीर्तीला ।
जरा न निश्‍चय करी सत्यता, द्याया वृत्तीला ।।४॥।
बाह्य भूषणे असली तरि का, तो होतो साध ?
साधु नव्हे रे गड्या! असे ती फसव्यांची जादू ।।५ ।।
तुकड्यादास म्हणे संतांनी, क्षमा द्यावि आम्हा।
पोटभऱ्याची स्थिती सांगतो, घ्या आपुल्या कामा ।।६ ।।