काम होते दुजिया बोले I

काम होते दुजिया बोले । शुद्ध शील नाही झाले ॥
सांगे थोरांचा अनुभव । आपण कोराची सदैव   ॥
आमुचे संत ऐसे होते । परि तू काय केले होते   ॥
तुकड्या म्हणे ऐसा नर । कोरा राहे जन्मभर   ॥