कठिण साधकाची रीति ।

कठिण साधकाची रीति । यासी विरळेचि साधती ॥
जग डोळे जाऊ नये । कोणी ओढतील पाय ॥
जरा कोणा हसू नये  I झणी घेरती जन हे ॥
तुकड्या म्हणे पाहता वरी । कामक्रोध शेंडी धरी ॥