मन बावरे तुझ्या विरहे, काही सुचेना ।
मन बावरे तुझ्या विरहे, काही सुचेना ।
जिव घाबरा अति भ्रमरा-परिस, बसेना ।।धृ०।।
असशी कुठे तू हरी? ही चिंतना अती ।
कुणि भेटवील का? म्हणुनी भटकते मती ।
कोणास पुसू, काय करु? चित्त घुसेना ।।1।।
काशी नि द्वारका करुनी, तीर्थ फिरुनी |
चारीहि धाम हे पहाता, ना दिसे कुणी ।
मनि शांति ना जरा दिसते, नेत्र फसेना ।।२॥।
कुणि संत, साधुही वदती, जवळची हरी ।
पहा ज्ञान-दिवा लावुनिया, हृदय-मंदिरी ।
नच मार्ग मिळे हा दृढ या, व्हावया मना ।।३॥।
ये भेट सख्या ! पतितासी, रूक्मिणी -वरा! ।
तू सर्वसाक्षि हे कळते, तुजचि श्रीधरा ! ।
तुकड्याची आस ही पुरवी, दे दर्शना ।।४॥।