धन्य धन्य सद्गुरुराज ! हे वैभव ज्ञानाचे |
(चाल: पतीतपावन नाम..)
धन्य धन्य सद्गुरुराज ! हे वैभव ज्ञानाचे |
काहि कळेना वर्णन करिता, न पुरे मन अमुचे ।।धू० ।।
अगाध तो ज्ञानामृत-सागर, बसला मुखस्थानी ।
सहजची राहे हृदयी गुरुच्या, रंगुनिया वाणी ।।१।।
चोदा विद्या, चोसष्ट कला, माघारा फिरती ।
चहुदेहाचा भेदुनि किल्ला, राहसि त्यावरती ।।२।।
अखंड साक्षी सदा असंगी, निर्विकल्प ज्योती ।
समरस होउनि अंतरि तुमच्या, प्रगट होइ दीप्ती ।।३ ।।
तुकड्यादास म्हणे किती वानु? न चले मम स्फूर्ती ।
बोधामृत निज-ज्ञान मिळाया, आर्त सखे वरिती ।।4।।