आणिकांचा संग मज न पडो ठावा
आणिकांचा संग मज न पडो ठावा ।
अखंडीत व्हावा दास तुझ्या पायाचा ॥
अगा ये दातारा! भीक देई भक्तिची ।
नको स्वर्गवास चाड नाही मुक्तिची ॥
सदा राहो ध्यान तुझ्या सगुण रूपाचे ।
नामी जडो मन रंगो प्रेम संतांचे ॥
नाडिला संसार तरी न सोडा देवा ! ।
करा करा ठेवा ब्रीद तुझे केशवा ॥
धरूनिया आस अंगी राहो उदासी ।
सुटो देह - भाव ठाव देई पायाशी ॥
तुकड्यादास म्हणे अंग संग ना सोडी।
असे जरी आढी तरी पांग हा फेडी ॥