काय नेना तुम्ही दयु बोलुनी देवा !
अध्यात्म - प्रार्थना
काय नेणा तुम्ही दायू बोलोनी देवा ! ।
काय मी लपावा म्हणुनी लपे अन्यावो ? ॥
अगा ये निर्गुणा ! सगुणाच्या साक्षिया ! ।
भाक जाई वाया ऐसा न करी अभावो ।।
फिरवी नेत्रांजन सोडी संदेह - गाठी ॥
लावविशी देठी हाचि धावे उमावो ।
आर्ताचिये माये! देसी ब्रीदा उल्हासू ।
पुसावया आसू धाव घेसी देशा वो ! ।
तुकड्या म्हणे तुम्ही उदारांचे उदार ।
तोडी येरझार हाचि भाव सद्भावो ॥