उरले ते भोगू नाही आस दुसरी

उरले ते भोगू नाही आस दुसरी ।
कष्ट झाले जरी सुख मानू ते ठायी ॥
जैसी फावे वेळ काळ कंठू आनंदे ।
लागोनिया छंदे नाम न सोडू त्याचे ॥
तोचि तो पहावां गावा अापुल्या चित्ती ।
तयावीण मति जाळू येर ना घेऊ ॥
सखा पांडुरंग नेवो ठेवो कोठेही।
तेणे दिशा दाही आनंदवू उत्साहे ॥
तुकड्यादास म्हणे फोड फोडला कर्मी।
आता नाही उम्मी कर्म धर्म संचिताची॥