कोंडवाडी मज ठेविले कोडुनी
कोंडवाडी मज ठेविले कोंडुनी । बांधिले बंधनी आसक्तिच्या ॥
कैसा तोडू बंध नेणो वर्म काही । ऐसा दिला नाही संग संतीं ॥
कोणाची संगती धरू पाहू आता ? । न सापडे हाता काही केल्या ।॥
करावे ते काय आपुल्या निर्धारे ? । ज्ञान नाही पुरे पाहो जाता ।
नाही शास्त्र-संग विद्या ज्ञान तेही । चोहोरी संदेही बुद्धि झाली ॥
तुकड्यादास म्हणे अनाथाची हाक । घेवोनी कलंक काढी देवा ! ॥