आसक्तीच्या जोरे भूले भक्तीभाव
आसक्तिच्या जोरे भुले भक्तिभाव। न राहे उपाव सांभाळाया ॥
॥ नाही समाधान आमुचिया जीवा । पोटासाठी धावा अहोरात्री ॥
सदा हाजी हाजी दांभिक लोकांची । तेणे भक्ति साची नष्ट झाली ॥
तुकड्यादास म्हणे करा काही साध्य । ना तरी असाध्य रोग झाल ॥