उभारील्या अंगी रोमरोमी

उभारिल्या अंगी रोमरोमी ध्वजा । चित्त अधोक्षजा! पाहो आले ॥
श्वास-गंगेमाजी पूर लाटोलाटी । स्वेद-बिंदू दाटी उफाळली ॥
नेत्रांचे पाझरी शब्द सद्गदीत । वृत्ति अर्धोन्मिलित दृष्टि झाली ॥
तुकड्यादास म्हणे भुले देह-भाव । अहोरात्री हाव लागो आली ॥