गंभीरता गंभीराची ।

गंभीरता गंभीराची । शांति करिते जनाची ॥
सुख होवो दुःख होवो । भोगुनि करावा निर्वाहो  ॥
करू नये विच्छिन्नता । दुजावरी अपुली सत्ता ॥
तुकड्या म्हणे न्याय नीति । धावे गंभीरा सांगाती ॥