आधी जरा दुःख भोगा ।

आधी जरा दुःख भोगा । तेव्हा पावा पांडुरंगा ॥
सहन करिता बाह्य दुःख । लाभे अंतरीचे सुख ॥
सुख न जाय मरता । जन्मोजन्मी येई हाता ॥
तुकड्या म्हणे संतापायी । शरण जावे लवलाही ॥