तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आम्ही जातो तीर्थयात्रे ।
आम्ही जातो तीर्थयात्रे । घरी उपासाची सत्रे ॥
कार्य त्यजुनी भजनी दंग । घरी म्हातारे अपंग ॥
लोका सांगो ब्रह्मज्ञान । घरी आमुच्या भांडण ॥
तुकड्या म्हणे ऐसी भक्ति । देवा न आवडे रति ॥