कासयासी त्यजा घर ।

कासयासी त्यजा घर । बसा डोंगरी दूर्धर? ॥
हृदयाची कुटी करा । बसवा रुक्मिणीच्या वरा ॥
मार्गी चालता बोलता । करा प्रेमभावे चिंता  ॥
तुकड्या म्हणे दुःख नेदा । सर्वव्यापी या गोविंदा ॥