कासयाने बांधू प्रेमाची मर्यादा ?

कासयाने बांधू प्रेमाची मर्यादा ? । ज्याचेनि गोविंदा प्राप्त केले ॥
प्राप्त केले सुख प्रेमियाचे मूळ । उद्धरिले कूळ तिन्ही लोकी l
नाही तया आड बंधने कोणती । वेदही नेणती तया सुखा ।।
तुकड्यादास म्हणे प्रेम हरिरूप । निष्काम स्वरूप नामी त्याचे ॥