कीर्ती लालसेने दानधर्म
संगतिस्तव लोक-निवड
कीर्ति - लालसेने दानधर्म देई । सदा दंभी राही वृत्ति ज्याची ॥
ऐसे जे का नर रजोगुरणी जाणा । तयाची करुणा न घे देव ॥
सदा सर्वकाळ काम खेळे मनी । नाही समाधानी वृत्ति कदा ।।
तुकड्यादास म्हणे धनाचिये आशे । होतील पै पिसे बहू ऐसे ।।