आळसा निद्रेसी सोडूनी बाहेरी
आळसा निद्रेसी सोडुनी बाहेरी । चिंता मनी हरी नाम वाचे ।।
असत्य भाषण न करावे जिव्हे । पाय टाकू नये आडमार्गी ॥
काया वाचा मने न करावी हिंसा । पाळावी अहिंसा हाचि धर्म ॥
तुकड्यादास म्हणे ब्रह्मचर्य व्रत । ठेवावे नेमस्त साधकांनी ॥