क्षणोक्षणी मन आवरावे ज्ञाने
क्षणोक्षणी मन आवरावे ज्ञाने । लावावे संधाने देवापायी ॥
ऐसाच अभ्यास असू द्यावा नेमी । क्रिया कर्म धर्मी सर्वकाळ ॥
आहारी विहारी अल्प समाधान । येणेचि प्रसन्न होऊ नये ।।
तुकड्यादास म्हणे सेवावा एकांत । तेथे सद्गुरुनाथ धाव घेती ॥