आहार विहार करी परिमित

आहार विहार करी परिमित । जरा ना दुःखित करी कोणा ॥
शांतवली वृत्ति रमली साधनी । मर्यादिच्या स्थानी स्थीर झाली ॥
सदा नित्यकर्म ज्ञान ध्यान धर्म । जप तप नेम सुरू झाले ॥
तुकड्यादास म्हणे ज्ञानाची भूमिका । विचारणा देखा बोलियेली ॥