कोट्यवधी जीव निर्मिले देवाने

कोट्यावधि जीव निर्मिले देवाने । सृष्टिचक्र तेणे उभारिले ।॥
अंत नाही त्याचा किती जन्म घ्यावे। कोट्यावधि जावे योनीमाजी॥
भोगांचे कोठार तया नाही पार । सखा सारंगधर लीला करी ॥
तुकड्यादास म्हणे विचित्र ही माया। दाखवी सौंदर्या लीलामात्रे ॥