कर्णाविण ऐके, नेत्रविना पाही

कर्णावीण ऐके, नेत्रावीण पाही । मुखावीण गाई आत्मा माझा ।।
जिव्हेवीण बोले, पायावीण चाले । देहावीण डोले आत्मा माझा ।।
नाकेवीण श्वास, रसेवीण रस । सदा एकरस आत्मा माझा ।।
तुकड्यादास म्हणे दिसे हे सर्वही । यावीण जे काही आत्मा माझा ॥