आत्मानात्म द्न्यान ठेवावे सामोरा


आत्मानात्म-ज्ञान ठेवावे सामोरा । आत्म्यावीण येरा मानू नये ।।
जे दिसे ते नाशे ऐसी आहे म्हण । ऐसे हे वचन भुलू नये ।।आत्माचि सर्वत्र व्याप्त परिपूर्ण । बोलिले हे ज्ञान गीतेमाजी ।
तुकड्यादास म्हणे करा अनुभव । धरूनिया भाव संतसंगे ॥