काय भरवसा आहे या जगाचा ?

काय भरवसा आहे या जगाचा ? । करू साचा भक्तिभाव ॥
स्वार्थाचे हे लोभी जमतील सवे । आपुले बरवे पाहावया ॥
सानथोर कोणी अधिकार नेणे । आपुलिया गुणे धावतील ॥
तुकड्या म्हणे याचा करावा विचार । जगी या निर्भर राह नये॥