कवित्व अनंत केले नानारूपे

कवित्व अनंत केले नानारूपे । परि नाही सोपे वाटे काही ॥
कठीण वाटले शब्दाचिये कीस । जरा ना चित्तास शांति पावे।।
प्रास अनुप्रास जोडूनि पाहिले । रंगी ना रंगले मन माझे ।॥
तुकड्यादास म्हणे सुखी तै मी झालो । प्रसाद लाधलो कवित्वाचा ॥