आहे जवळी आनंद

आहे जवळी आनंद । काय घेसी विषय - स्वाद ? ॥
आगंतुक   बहीर्मुख । काय सांगे त्याचे सुख ? ॥
क्षणोक्षणी एके वाटे । पुढे दुःखचि ते थाटे ॥
तुकड्यादास म्हणे जाणा । ब्रह्मरसाचिया खुणा ॥