कायरे मागसी कोणा

कायरे मागसी कोणा जवळोनि ?। तृचि आहे धनी त्रैलोक्याचा ॥
ओळखोनि राही आपुल्या स्वरूपा । चौऱ्यांशीच्या खेपा चुकतील ॥
देवाचाहि देव आत्मा पूरिपूर्ण । ओळखी ही खुण गुरु - कृपे ।
तुकड्यादास म्हणे आहेसि तू श्रेष्ठ । वासनेने भ्ष्ट वाटे तुज ।।