एक सोडावया दुसरी उपाधी

एक सोडावया दुसरी उपाधि । लागे आधी आधी उपाधि ही ॥
दोन्हीही राहती वासनेच्या बळे । उपाधिने काळे तोंड होते ॥
संसारा उपाधि परमार्था उपाधि । उपाधीसि कधी रीघ नाही ॥
तुकड्यादास म्हणे हे होई अज्ञाने । ज्ञानियासि दुणे लाभ पावे ॥