अहंकार परिच्छिन्न

अहंकार       परिच्छिन्न । याने बुडविले भजन ॥
होतो साधकाच्या आड । जैसा वाटतो  पहाड ॥
लागू न  दे    भक्तिभाव । करी आपुला गौरव ।।
तुकड्या म्हणे याते सारा । तरिच पावे भक्ति-झरा ॥