आहे मोकळा बाजार I

आहे मोकळा बाजार। लुटा लुटा गोणीवर ॥
काय पहिजे ते मिळे । जाहो जाहो जा सगळे ॥
जैसे लागे तैसे घ्यावे । श्रद्धा भाव मोल द्यावे ॥
तुकड्या म्हणे संतांघरी । माल अखंड भांडारी ॥