उदासोनि काय होते ।

उदासोनि काय होते । कोण देईल आयते ? ॥
करा करा संतसंग । वेळ गेल्या नये रंग  ॥
पुढे काय होय कोणा । कोण जाणे याच्या खुणा ? ॥
तुकड्या म्हणे कर्तव्याने । फेडा देहाचे पारणे ॥