केले आपुलेचि होते ।

केले आपुलेचि होते । संत का देई आयते  ॥
आम्ही करू तैसे भरू । तेणे होय हा संस्कारू ॥
रंग  लागे देहादिका । नित्य केलिया सारिखा ॥
तुकड्या म्हणे करा काही । जेणे देव अपुला होई ॥