अहर्निशी साक्ष घ्यावी ।

अहर्निशी साक्ष घ्यावी । मती कुमति पहावी ॥
मार्ग न्याहाळावा नीट । चालतांना पुढे वाट  ॥
सदा करावा विचार । पाहोनिया नित्याचार  ॥
तुकड्या म्हणे जे आंधळे । अविचारे मधी गळे ॥