कष्ट करी स्वतः अंगे

कष्ट करी स्वतः अंगे । करोनिया लोकां सांगे ॥
कधी न राही रिकामा । भजे मनी मेंधश्यामा ॥
मनी जरा नाही लाज ! करावया घरी काज ॥
तुकड्या  म्हणे संतापायी  । लीन सदा दक्ष राही ।॥