आवडला मज सखा पंढरिराणा।
आवडला मज सखा पंढरिराणा। चित्त तयाविना शांत नोहे ॥
तयाचेचि लेणे लाविन या देहा । काढीन संदेहा घरांतुनी ॥
हाती टाळ खांदी पताकांचा भार । नामाचा उच्चार मुखावाटे ॥
तुकड्यादास म्हणे मना मोहविले । आपुलेसे केले पंढरिराये ॥