उठारे सर्वही चला पंढरीसी ।
उठारे सर्वही चला पंढरीसी । भेटू विठ्ठलासी जाऊनिया ॥
खरा पांडुरंग दीनांचा कैवारी । संकटे निवारी धावोनिया ॥
आपुलाले दुःख सांगु तयापाशी । दया येई त्यासी आपुलीये ॥
तुकड्यादास म्हणे दुजा नाही कोणी । फिरता त्रिभुवनी कनवाळू ॥