एका मनुष्याशी केला खेळ जीवे
एका मनुष्याशी केला खेळ जीवे । ठेवियेली नावे नाना त्यासी ॥
कोणी म्हणे बाप कोणी म्हणे काका । तात्या मामा हाका मारी कोणी।।
कोणी म्हणे व्याही साळा साळभाऊ। कोणी म्हणे भाऊ मोठा माझा ॥
तुकड्यादास म्हणे जीवाचे कौतुक । एकाची अनेक सोंगे करी ॥