एका बीजाची उत्पत्ति

एका बीजाची उत्पत्ति । बीजे अनंत वाढती ॥
तैसी देव-व्याप्ति क्षेत्री । बीजरूपे ही सर्वत्री ॥
भिन्न भिन्न नोहे पाणी । दिसे घटाचे कारणी ॥
तुकड्यादास म्हणे एक । एकी भासती अनेक॥