कासया कारणे केली ही नाटके ?

कासया कारणे केली ही नाटके? । काय तुझ्या सुखे सुख नोहे? ॥
आपणचि झाला माया पुरुष दोन्ही। व्याला जनी वनी त्रैलोक्यासी॥
संचला जीवत्वी भिन्नभासावया । अगम्य ही माया केली ऐसी ॥
तुकड्यादास म्हणे पाहता करिता । एकचि तत्वता होसी देवा! ॥