कैकेयी आडवी धावोनिया बोले ।
कैकेयी आडवी धावोनिया बोले । माझियाने झाले कष्ट रामा! ॥
राम म्हणे कोणा कष्टविना कोणी । प्रारब्धाने प्राणी येतो जातो ।।
तुझियाने काय होते सांग आई! । होणार ते होई चुके कैसे ? ।।
तुकड्यादास म्हणे सुखे चाले राम । द्यावया विश्राम भक्तालागी ॥