काय आम्हापाशी गाडलासे हांडा ?

काय आम्हापाशी गाडलासे हांडा? । सांगता पोवाडा आपुलासा ॥
भिकारी आम्हीच दिसतो तुम्हासी । तरि आम्हापाशी येता कैसे? ॥
धनी जरी होतो काय ऐसे होते?। गज ते राहते दारामाजी ॥
तुकड्यादास म्हणे सांगा देवापाशी । करील तो खुश तुम्हा लोका ॥