आरती सद्गुरुराया । ज्ञाने बोधीयेली काया
(चाल : आरती तुकारामा....)
आरती सद्गुरुराया । ज्ञाने बोधीयेली काया ।
भुलविला अहंभाव । लावोनिया नाम गाया ॥धृ०॥
महावाक्य गुरु - मंत्र । कृता त्रेता द्वापारी ।
कलीयुगामाजी जना । दिली रामनामी थोरी ॥१॥
अज्ञान पट फोडी । दावोनिया मार्ग सोपा ।
रंगवी स्वात्म रंगी । शब्द परेचिया - दीपा ॥२॥
गुरु माझा जीव प्राण । जेणे दावीयेली सोय I
तुकड्यादास म्हणे झाला । झाला स्वानंद उदय ॥३॥