मना रे ! नाम जप हरिचे, सुखाचे घोस लाभाया

मना रे ! नाम जप हरिचे, सुखाचे घोस लाभाया |
भटकशी का विषय-मार्गी? अधिकसे दु:ख भोगाया || धृ०।|।
कुणी सतप्रेम धरुनीया, हरीच्या ध्यानि रत होती |
मिळे साम्राज्य मोक्षाचे, परी ना सोडि हरि-पाया || ९॥।।
भक्तिच्या सुख-स्वातंत्र्यी, मोक्षही तुच्छ संतासी |
अनुभवा घेउनी पाहे, भजुनिया पंढरीराया |।२ ||
म्हणे तुकड्या ऊठ वेगे, साध सत्‌-संगती आधी |
प्राप्त कर मार्ग प्रेमाचा, दुरावुनि संशयी माया ||३ ||