मनाची धाव ती सगळी, विषय-भोगातची लोळे

मनाची धाव ती सगळी, विषय-भोगातची लोळे ।
कुठे करतील तप भोळे? नसे एका मुखी राम ।।१॥।
मनी घरदार ते खेळे, म्हणे कोठे गडी सगळे? ।
सदा धन - संपदी लोळे, पहाया वाढला नेम ।।२॥।
मला हे द्या, मला ते द्या, मला द्या सर्व घरदार ।
बुडविले यातची थोर, कशाचा तो पुढे श्याम? ।।३॥|
प्रपंची लावुनी आस, स्व-घरचा सोडला ध्यास ।
म्हणे तुकड्या तया नाश, कधी ना भेटतो राम ।।1४॥।