मना वाटे, हरी ध्यावा, कि गुरुचे पाय वंदावे?

मना वाटे, हरी ध्यावा, कि गुरुचे पाय वंदावे ?।
कोण ते श्रेष्ठ जाणोनी, शरण आधी कुणा जावे ?॥धृ०॥।
प्रभू हा बोलिला शास्त्री, शरण जा माझिया भक्ता |
देव अणि भक्त हे दोघे, द्वैत हे केवि मानावे ?।।1॥।
भिन्न मानू नये त्यांना, जये प्रभु दाविला सत्ते।
धन्यता संतसेवेची, किती उपकार वबानावे ?।।२॥।
देव मानी तया भक्ता, भक्त देवा सदा ध्याती।
कळेना गुह्य हे त्यांचे, कुणा सरसावुनी ध्यावे ?।।३॥|
निभविली आस तुकड्याची, गुरुने देव दावोनी ।
तया मी श्रेष्ट मानावे, मने हे   घेतले   भावे ।।४॥